- डोंगरे कुल-वृत्तांताचे संपादक-
मोरो हरी खरे
संपादक - मूळ आवृत्ती (पहिली) १९४३
कुल-वृत्तांताचे संपादन हे केवढे महत् कार्य आहे - गम्मत म्हणजे ज्यांच्यासाठी त्याचे संपादन करावयाचे त्यांचेच या विषयाबाबत निर्दिस्त असणे- आपल्यातच मग्न - असहकार्याचे रूप पहाता हा खटाटोप तरीही करणारे याचे मुळाशी असणारे व्रतस्थ-संपादक मंडळ. ह्यांचेबाबत आपले विचार अधिकच प्रगल्भ पद्धतीने कार्यान्वित होतात. आणि त्यांचे संबंधाने अधिक माहिती आपल्याला हवी अशी तीव्र भावना होते. आणि नेमकी हीच माहिती- अनेक कारणांनी सहज उपलब्ध नसते.
संपादक मंडळी स्वत: इतकी व्रतस्थ व निस्पृह स्व: संबंधाने त्यांनी निदान कुल-वृत्तांताततरी कांहीच लिहिलेले नसतेच. आपले 1943 चा व 1999 ची अशी दोनही कुलवृत्तांताचे वाचन आणि प्रत्यक्ष उपयोग करताना याची तीव्र जाणीव होते. आणि ही सारी संपादक मंडळी आपल्याला आणखीच "उंच" वाटतात त्यांचे संबंधाने अधिक माहिती गरजेची वाटते.
आपल्या पहिल्या कुल-वृत्तांताचे (1943)
प्रवर्तक -
विनायक कृष्ण डोंगरे व दिनकर कृष्ण डोंगरे
प्रवर्तक -
विनायक कृष्ण डोंगरे व दिनकर कृष्ण डोंगरे
दिनकर कृष्ण डोंगरे |
विनायक कृष्ण डोंगरे |
संपादक - मोरो हरी खरे यांचे संबंधाने कितपत विस्तृत माहिती आज आपण डोंगरे कुटुंबियांना आहे?
आपल्या
कुलवृत्तांताच्या दुस-या आवृत्तीचे संपादक दत्तात्रेय मोरेश्वर डोंगरे आणि
सुधाकर विष्णू डोंगरे यांनाही ही जाणीव तीव्रतेने झाली असावी. आपल्या
"संपादकीय मनोगतात" (पृष्ठ 9 वर )त्यांनी त्यांची इच्छा असून
विनायक कृष्ण
डोंगरे आणि दिनकर कृष्ण डोंगरे यांची माहिती मिळू न शकल्याचा खेद-रुखरुख
त्यांनी स्पष्ट केली आहे.
मोरो हरी खरे |
आज मलाही नेमक्या याच विषयांत लक्ष घालावे,
आपल्यावरील या उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या संपादकांचे ऋणाची जाणीव
व्हावी व त्यातून त्यांचे संबंधाने अधिक माहिती मिळवावी असे तीव्रतेने
वाटले. हळूहळू नेमके प्रयत्न करून आपण सारेच यात लक्ष घालून ही त्रुटी कमी
करूया.
सुरुवात अर्थातच स्मरण त्या क्षेत्रोपाध्यायांचे ज्यांनी
आपल्या संग्रही असलेला अमूल्य ठेवा - 200 - 300 वर्षे अशा दीर्घ काळात
पिढ्यान्पिढ्या जमवलेली जतन केलेली वंशावळी व माहिती आपल्यासाठी उपलब्ध
केली.
त्र्यंबक - त्र्यंबक वामन फडके
धांडभट फडके
बाळभट फडके
रघुनाथशास्त्री पाटणकर
वेदमहर्षी प्रदक्षिणे
त्र्यंबकभट पिंगळे
विनायक लक्ष्मण मेघश्याम
गणेशभट फाळके
नाशिक
- वामनभट अनंत दाते, अंबादास बाबुराव पाराशरे सोमेश्वर बाधालाल उध्वर्यु
या सर्व क्षेत्रोपाध्यायांचे संबंधी आपल्याला काहीच माहिती नाही. हे सारे
आपले इतिहासकार आहेत. यांनी इतिहासाच्या खुणा सुरक्षित ठेवून त्या आपल्याला
उपलब्ध केल्या आहेत. आज त्यांच्या वंशजांकडून काही माहिती उपलब्ध होते का
हे पाहिले पाहिजे. पैठण, त्र्यंबकेश्वर, काशी यांसारखी इतिहास जतन करणारी
संस्था आपण आज पूर्णपणे घालवून बसलो आहोत. तीर्थक्षेत्रांमधे आज आपण आपली
वंशावळ सोडाच स्वत:चे खरे नांव, गाव हेसुद्धा कोणा उपाध्यायांना सांगू
इच्छित नाही. नव्याच भीतीने सारे जगच आपण बदलले आहे. आता आधार"आधार कार्ड,
पॅन, निवडणूक अधिका-यांनी दिलेले ओळखपत्र..... वगैरेवर घ्यावा लागणार आहे.
नव्या कुल वृत्तांतांची हीच साधने असतील. असो थोडे विषयांतर की
विषयविस्तार?
मोरो हरी खरे आपले आद्य इतिहासकार
पहिल्या
कुल-वृत्तांताचे संपादक यांची माहिती ह्या विषयाने मला चांगलेच झपाटले
होते. ब-याच ठिकाणी प्रयत्न करून यश आले नव्हते. पण अखेरीस
खरे-कुल-वृत्तांतच मिळवला कारण त्याचे संपादन मोरो हरी खरे यांनीच केले
होते. पण हाती काहीच लागले नाही. हा इतका निस्वार्थी विद्वान. स्वत:च आपली
माहिती किती देणार!
मग सुधाकर विष्णू डोंगरे यांचा या संबंधांचा प्रयत्न
वाचला. त्यांनीही हाच ध्यास घेतला होता. त्यांना अशी माहिती पहिल्या
आवृत्तीच्या संपादकांबाबत देणे शक्य होते. अर्थात त्यांना त्यात यश आले
नाही. याची रुखरुख त्यांनी व्यक्त केली. पण मला त्यातून दिशा मिळाली. मी
भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वाचनालयात खरे-कुल-वृत्तांताची पुढची आवृत्ती
मिळवली. खरे कुल-वृत्तांतातील येथे संग्रहित व सादर केलेली माहिती आपल्या
जिज्ञासूंना काही प्रमाणात समाधान देईल शिवाय इथे त्यांचा उपलब्ध फोटोही
दिला आहे त्यामुळे अधिक शांती लाभेल. आणखी काही माहिती आपणास उपलब्ध असेल
तर ती आवश्य कळवावी. आपण ती संग्रहित करू.
मोरो हरी (7) पौ. शुद्ध 13. गुर्लहोसूर. गरीबांच्या मुलानी वार लावून व
मधुकरीमागून विद्याभ्यास करावा, हे शिक्षण देण्यासाठी वडिलांनी यांना
मुंजीच्या दिवसापासून मधुकरी मागण्यास लाविले, यामुळे पुढे रामदुर्ग,
संवदत्ती, धारवाड व जमखंडी येथील विद्याभ्यास वार लावून व मधुकरी मागून
यांना पुरा करितां आला. स. 1904 मध्ये मॅट्रिक परीक्षेत सर्व विद्यार्थ्यात
5 वा क्रमांक मिळविला व संस्कृतमध्ये जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती
मिळविली; प्रीव्हीयसच्या अभ्यासास दुस-याचे सहाय्य लागले नाही. स. 1910
मध्ये एल्. सी. ई. झाले. इंजिनिअरिंग कॉलेजांतील अभ्यासास चुलत बंधु गणेश
सखाराम (8-7) यांची आर्थिक मदत झाली. ठाणे, खानदेश, रत्नागिरी व कुलाबा
जिल्ह्यांत सरकारी एंजिनीअरिंग खात्यांत 5 वर्षे दरमहा 100 रु. वर नोकरी
केल्यावर पुण्याच्या एंजिनीअरिंग कॉलेजांत बदली झाली; व वाढत वाढत
प्राध्यापक झाले. श. 1859 मध्ये सेवानिवृत्त होताना पगार 570 रु. होता; व
पेन्शन 216।। रु. मिळत होते. स्वत:च्या श्रमाकडे न पाहता विद्यार्थ्यांना
विषय समजावून देणारे व त्यांना पुस्तके व आर्थिक मदत करणारे, म्हणून यांची
ख्याती होती. बरीच वर्षे पावेतो घरी 3-4 विद्यार्थी ठेवून त्यांना अन्न,
वस्त्र, फी व पुस्तके पुरवीत. श. 1836 पासून खादीचीच वस्त्रे वापरीत. राहणी
अत्यंत साधी व मनाने अत्यंत मायाळू व धर्मशील होते. पहिल्यापासून
आप्तेष्टांचा परामर्ष चांगल्या त-हेने घेत. पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर
स्वकष्टार्जित पैशाने बांधिलेला "प्रभात किरण' बंगला त्यांचा होता.
शिक्षणाचे कामी चुलत बंधूंच्या आर्थिक सहाय्याची आठवण ठेवून ते विद्यमान
असताना बहुतेक पैसे परत दिले व नंतर त्यांचे मुलास शिक्षणाकरिता व
व्यापाराकरिता सहाय्य केले. प्रवासाची विशेष आवड असल्यामुळे हिंदुस्थानातील
बहुतेक तीर्थयात्रा केल्या व ऐतिहासिक स्थळे पाहिली. कित्येक
ज्योतिर्लिंगांचे दर्शन अनेकवार केले. पुणे येथील शिक्षण प्रसारक मंडळी,
ब्राह्मण कार्यालय, महाराष्ट्रीय मंडळ, वेदशास्त्रोत्तेजक सभा, डेक्कन
एज्युकेशन सोसायटी, संस्कृत कॉलेज, सरस्वती मंडळ व रिक्रिएशन क्लब बैलहोंगल
इत्यादी संस्थांचे सदस्य आणि खरे-कुल-वृत्तांत-प्रथमावृत्ति, 1940 चे
संपादक होते. हे अपघाताने मृत्युमुखी पडले. स. 1945.
भार्या - (1)
सरस्वती (वेणू) ज. श. 1810 वि. श. 1821 या नेहमी हसतमुख, कष्टाचा सराव
असलेल्या व गृहकृत्यांत दक्ष, व कुशल अशा होत्या, आपल्या सासू-सास-यांना
यांनी आपल्या वर्तनाने पूर्ण संतोष दिला. मृ. श. 1824 भा. व. 10 प्लेगने.
पि. हरी शिवाजी गोखले. जाळीहाळ.
(2)लक्ष्मी (मथुरा) ज. श. 1811 वि. श. 1825 लग्नानंतर तीनच महिन्यांनी मृत्यू पावल्या. पि. बाळकृष्णशास्त्री परांजपे, धारवाड.
(3)
अन्नपूर्णा (गोदावरी) ज. श. 1818 गृहकृत्यांत दक्ष असून कथापुराणे श्रवण
करण्याची फार आवड. दासबोध, रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप इत्यादी
ग्रंथांची कित्येक पारायणे केली. महाभारत, रामायण, योगवासिष्ठ इत्यादी
ग्रंथांची चिपळूणकर भाषांतरे व नानाबुवा साखरे यांची ज्ञानेश्र्वरी इत्यादी
धार्मिक पुस्तके वाचली, गरीब विद्यार्थ्यांना पतीनी आश्रय दिला- त्याचे
बरेचसे श्रेय यांना आहे. मन फार कनवाळू असून दुस-यांच्या दु:खाने फार लवकर
दु:खी होत. सासूबाई वृद्धापकाळी अंथरुणाला खिळल्या तेव्हा यांनी त्यांची
सेवा मनोभावाने केली.
कन्या - *प्रभावती - ज. श. 1844 फा. शु. 7
इंग्रजी 6 वी, एलिमेंटरी ग्रेड ड्रॉइंग परीक्षा पास. गृहकृत्य दक्ष. भ्र.
गोखले. दि. ब. देवधर गल्ली, डेक्कन जिमखाना, पुणे - 411 004.
2)
मानीव कन्या - इंदुमती - ज. श. 1839 ज्ये. व 6, तान्ही असताना मातूश्री
वारल्यामुळे तेव्हापासून स्वत:च्या मुलीप्रमाणे संगोपन व शिक्षण. कै. मोरो
हरी खरे यांनी केले. हायस्कुलात व कॉलेजमध्ये पारितोषिके मिळविली. सर
परशुरामभाऊ कॉलेजातून बी. ए. वि. श. 1858. भ्र. डॉ. यशवंत विश्वनाथ फाटक,
एम्. बी. बी. एस्. पुणे.
द्वितिय आवृत्तीचे संपादक दत्तात्रय मोरेश्वर डोंगरे व सुधाकर विष्णू डोंगरे
सुधाकर विष्णू डोंगरे |
दत्तात्रय मोरेश्वर डोंगरे |